महती राजाची : नगरसेवक हि राजाचीच कृपा

0

सामाजिक जीवनात काम करत असताना पक्षाची पदे भूषवली.समाजात चांगले कार्य माझ्याहातून घडत होते.माझा मित्रपरिवार आणि सामंत कुटुंबियांची साथ मला सदैव राहिली.एका निवडणुकीत पराभव झाला पण खचलो नाही.समाजसेवा सोडली नाही.त्यातच श्री रत्नागिरीच्या राजाची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले.यासेवेचे फल राजाने मला दिले आहे.आज मी जो काही घडलो आहे.नगरसेवक म्हणून काम करतो आहे हि सारी त्याचीच कृपा असून काय मिळावे म्हणून नाही तर मनात असलेली श्रद्धा आणि देवावर असलेला विश्वास यातून हे कार्य असेच पुढे सुरु राहील असा विश्वास नगरसेवक निमेश नायर यांनी व्यक्त केला.

निमेश नायर
शिवसेना नगरसेवक

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:51 PM 31/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here