जिल्ह्यात ३६,७३० घरगुती; तर ५१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे आज होणार विसर्जन

0

रत्नागिरी : कोरोना सावटामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे. आज अनंत चतुर्दशी, बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात यंदा १,६६,६६० घरगुती गणपतींची तर १०७ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती त्यापैकी १०४४६ घरगुती आणि १६ सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांनी, ५३८ घरगुती आणि ४ सार्वजनिक गणपतींचे पाच दिवसांनी तर १,१५,५३७ घरगुती आणि ९ सार्वजनिक गणपतींचे गौरी बरोबर विसर्जन करण्यात आले. वामन द्वादशीला १७१४ घरगुती आणि ११ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला ३६,७३० घरगुती आणि ५१ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी प्रशासनातर्फे ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळांची स्वच्छता करण्यात आली आहे. विसर्जनावेळी कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. समुद्र किनारी जीवरक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here