माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

0

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रणव मुखर्जींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी मार्ग इथं ठेवण्यात येणार आहे. दरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद दहा वाजेच्या दरम्यान राजाजी मार्ग इथं पोहोचणार आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जीं यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवन आणि संसदेतला झेंडा अर्ध्यावर आणला गेला आहे. प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालच्या ममता सरकारने देखील १ दिवसाचा शोक घोषित केला आहे. सर्व सरकारी कार्यालयं आज बंद राहणार आहेत. राज्य पोलीस दिनाचा कार्यक्रम २ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here