खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे तर्फे ३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे तर्फे गुरुवार दि. ०३ सप्टेंबर रोजी साखरी नाटे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचे काम खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे करते. याच भावनेतून कोरोना संसर्गाची स्थितीत आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. शिबिराच्या काळात करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन केले जाणार आहे. गुरुवारी सकाळी ०९:३० वाजल्यापासून साखरी नाटे येथील वरचा वाडा हुझरा-ए-दस्तगिर येथे हे शिबिर होईल. तरी या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे मार्फत आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकानी खिदमत फाऊंडेशन साखरी नाटे यांना संपर्क साधावा.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here