जेईई परीक्षा: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

0

मुंबई : आजपासून ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे अडचणीचे आहे. ”विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे होणारी जेईई मुख्य परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. याबाबत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली असून विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये”, असे ट्विट सामंत यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here