सुरक्षा रक्षकांचे मागील दहा महिन्यांपासून वेतन रखडले

0

रत्नागिरी : पॉलिटेक्निक विभाग रत्नागिरी येथे कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक मागील दहा महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सदर सुरक्षा रक्षक हे सुरक्षा रक्षक मंडळ या शासकीय विभागा अंतर्गत काम करतात. तरी हे सुरक्षा रक्षक आज वेतन नसल्याने उसनवार घेऊन कर्जबाजारी झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देत आहेत. शासनाचे सुरक्षा रक्षक असून देखील वेतन मिळत नाही याचा खेद आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुरक्षा रक्षक न्याय संघटनेने दखल घेऊन लवकरच त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सुरक्षा रक्षक न्याय संघटना जिल्हाध्यक्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्वप्निल चौगुले यांनी दिली

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here