मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक बनण्यास हा माजी यष्टीरक्षक उत्सुक

0

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पुरुष संघाचे प्रशिक्षक, निवडकर्ता आणि इतर प्रशिक्षकांसह विविध पदांसाठी अर्ज मागविले होते. यासाठी माजी यष्टिरक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईचा आणखी एक माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंतने यासाठी अर्ज केला नसल्याचेही समजते. शेवटच्या दोन सत्रात ते संघाचे प्रशिक्षक होते. एमसीएच्या सर्वोच्च समितीच्या सदस्यांनी सोमवारी क्रिकेट सुधार समितीच्या (सीआयसी) सदस्यांची भेट घेतली आहे. सीआयसीत भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश आहे कुलकर्णी हे स्थानिक क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे ज्यांनी पहिल्या तीन सत्रात मुंबईला प्रशिक्षण दिले. यापूर्वीही ते विदर्भ आणि छत्तीसगड संघासोबत काम पाहिले आहे. कुलकर्णी नेपाळचा फलंदाजी प्रशिक्षकही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी या पदासाठी अर्जही केला होता पण त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये वर्ल्ड सिरीज जिंकणार्‍या दिव्यांग भारतीय संघाचे प्रशिक्षक केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here