दि.२७ आगस्टपासून एसटी प्रशासनाची ‘टॉपअप’ सुविधा सुरू

0

रत्नागिरी : एसटीचे आरक्षण देणाऱ्या केंद्रधारकांना पैसे भरण्यासाठी दररोज आगारात यावे लागू नये यासाठी एसटी प्रशासनाने ‘टॉपअप’ सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा दि.२७ आगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे. दिवसभरात आरक्षित होणाऱ्या तिकीटाची रक्कम दररोज नजिकच्या आगारात जमा करणे बंधनकारक असते. यासाठी आरक्षण केंद्र चालकांना दररोज सायंकाळी आगारात जावे लागत होते. त्यामुळे त्यांना वेळ व प्रवास खर्च असा भुर्दंड बसत होता. प्रगत तंत्रज्ञानाने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने त्याचा वापर करावा, अशी मागणी आरक्षण केंद्रचालकांकडून होत होती. त्या मागणीचा विचार करुन एसटीने टॉपअप सुविधा सुरू केली आहे. खासगी एजंटच्या टॉपअप सविधेसाठी एक वॉलेट तयार केले आहे. या वॉलेटमध्ये टापअप केल्यानंतर संबंधित एजंटना आगाऊ आरक्षणाद्वारे तिकीट विक्री करता येणार आहे. सर्व खाजगी एजंटस् वॉलेटमध्ये प्रथम २५ हजार टॉपअप करतील व त्यानंतर दहा हजार रुपयांच्या पटीत टॉपअप करतील. प्रत्येक एजंटना टॉपअप करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड मे.ट्रायमक्स कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टॉपअप करण्याकरिता पेमेंट गेटवेच्या सहाय्याने नेट बँकींग, डेविट कार्ड व क्रेडिट कार्डद्वारे करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here