रक्तपरिवहन वाहनाच्या टायरसाठी आ.शेखर निकम यांची मदत

0

चिपळूण : जिल्हा रुग्णालय रक्तपेढीसाठीचे असणारे वाहन नादुरुस्त झाले होते. या वाहनाचे सर्व टायर खराब झाले होते. रक्तसंकलन हे रक्तदान शिबिराद्वारे होत असते. त्याकरिता रक्तपरिवहन वाहनाची आवश्यकता असते. या नादुरुस्त झालेल्या वाहनाच्या दुरुस्तीसाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी २५ हजार रुपये देणगी स्वरूपात दिले आहेत. आमदार शेखर निकम यांनी शासकीय निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता स्वतः पंचवीस हजार रुपये देणगी स्वरूपात दिले. आता हे वाहन दुरुस्त झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी आमदार शेखर निकम यांचे याबद्दल आभार मानले आहेत. तसेच यापुढेही असेच सहकार्य आपल्याकडून लाभेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here