भररस्त्यातील खोदाईविरोधात भाजपचे पालिकेला निवेदन

0

रत्नागिरी : भररस्त्यात विविध कामांसाठी खोदाई केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे खोदाई केल्याने वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना दंडाचा फटका बसत आहे. त्याविरोधात भाजपाच्या उद्योग आघाडीतर्फे पालिकेला निवेदन देण्यात आले. रत्नागिरी नगरपालिकेने शहरातील नळपाणी योजनेसाठी खोदाई सुरू केली आहे. पाणी योजनेसाठी खोदाई असल्याने ही गोष्ट आवश्यक असली तरी हे चर व्यवस्थित बुजवले जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक मुकुंदराव जोशी आणि अॅड. मनोहर दळी यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदन दिले. शहरातील मारुती मंदिर सर्कलमध्ये खोदाई करून पाइपलाइन घातल्यानंतर हे चर व्यवस्थित बुजवले गेलेले नाहीत. तेथे ठिकाणी मातीचे ढीग झाले आहेत. त्यामुळे समोरील दुकानात जाण्यासाठी नागरिकांना मोठी समस्या होत आहे. पाइपलाइनसाठी चर गटारापासून रस्त्याच्या आतील भागात खोदण्यात आल्यामुळे वाहतुकीला अर्धा रस्ताच मिळत आहे. चर व्यवस्थित न बुजवलेल्याने दुकानात जाण्यासाठी वाहने उभी केल्यावर वाहतूक पोलीस तात्काळ फोटो काढून वाहनचालकांवर दंडाची कारवाई करतात. पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना नाहक दंड होत आहे. यामुळे पालिकेने तात्काळ हे चर व्यवस्थित बुजवून सपाटीकरण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत वाहतूक पोलिसांनाही देण्यात आली आहे रस्ता पूर्ववत होईपर्यंत तारतम्य बाळगून दंडाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 02-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here