कोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

0

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू होतच नाही. आतापर्यंत झालेले सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. एका मुलाखती दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी इतके आग्रही का आहात, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्याप्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी कोरोनाचा प्रभाव मान्य करेल. मुळात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू हे नैसर्गिकच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 02-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here