परतीच्या प्रवासासाठी २२६ जादा बसेसचे नियोजन

0

देवरूख : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी दि. ७ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत देवरूख आगारातून सुमारे २२६ जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली आहे. समस्त कोकणवासीयांचा लाडकागणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकणातील चाकरमानी नोकरी निमित्ताने मुंबई व पुणे यांसारख्या शहरात वास्तव्यास आहेत. हे चाकरमानी गणशोत्सव सण साजरा करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. हा सण साजरा केल्यानंतर सर्व चाकरमानी आपआपल्या शहरांकडे रवाना होतात. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देवरूख आगाराने आतापासून कंबर कसली आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी देवरूख आगारामार्फत या वर्षीही उत्तम नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ९ दिवसात तब्बल २२६ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात मुंबई-३३, बोरिवली-५३, कल्याण-७, ठाणे-१२, गांडुप -८, नालासोपारा-१४, पुणे-१४ अशा एकूण १४१ जादा बसेस, तर ७९ हंगामी जादा बसेस व ६ ग्रुप बुकिंग बसेस अशा २२६ जादा बसेस देवरूख आगारातून सोडण्यात येणार आहेत. यामध्ये साखरपाबोरीवली, साखरपा- मुंबई, साखरपा -ठाणे, साखरपा -नालासोपारा, देवरूख-मुंबई, देवरूख-ठाणे, देवरूख -बोरिवली, देवरूख- गांडुप, देवरूख-नालासोपारा, करजुवे-मंबई, करजुवे-बोरिवली, संगमेश्वर-मासरंग -मुंबई वसंगमेश्वर-मासरंग -बोरिवली या जादा बसेसचा समावेश आहे. याबरोबरच तालुक्यातील विविध गावातून भालिकांच्या मागणीनुसार आगारामार्फत जादा बसेसचे ग्रुप बुकिंग करण्यात येणार आहे. या सर्व जादा बसेसचा लाा चाकरमान्यांनी बहुसंख्येने घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here