कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

0

सिंधुदुर्ग : कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत जिल्हा परीषदेच्या सर्व सभा ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण आणि आरोग्य सभांनी याची सुरूवात होणार असुन सर्व विषय समिती सभांसह स्थायी आणि जिल्हा परीषद सर्वसाधारण सभाही याच पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडुन सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश होईपर्यंत सर्व सभा व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचे आदेश २५ ऑगस्ट रोजी ग्राम विकास विभागा कडुन जि.प. ला देण्यात आले आहेत. त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गुरूवार ३ रोजी शिक्षण आणि आरोग्य समितीची सभा होणार आहे. या सभा झूम एपच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. संबंधित सभापतींना याबाबतची माहिती देण्यात आली असुन त्यांनी आपल्या निवासस्थानातून अथवा कार्यलयातून या सभा घेण्याची सूचित करण्यात आले आहे. तर संबंधित सभा सदस्याना मीटिंग बाबतची लिंक पाठविण्यात आली आहे. अशी माहिती शिक्षण समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here