कोरोनाच्या कॉलरट्युनला लोकं आता वैतागलेत; मनसे पाठोपाठ आता रोहित पवार यांनी केली ‘ही’ मागणी

0

मुंबई : कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून गेल्या ५ महिन्यांपेभा जास्त कालावधीपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार यांनीही कोरोना कॉलर ट्यूनचा लोकांना वैताग आल्याचं म्हटलंय. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनाच्या कॉलर ट्यूनबद्दल प्रश्नार्थक पोल घेतला होता. कोरोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनसाठी दुसरा पर्याय हवा का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला होता. त्यावर, तब्बल 88 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं असून केवळ 12 टक्के नेटीझन्सने नको असं म्हटलंय. रोहित पवारांच्या या पोलमध्ये 3009 जणांनी आपला सहभाग नोंदवला आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती केली आहे. कोरोनाच्या कॉलर ट्यूनला लोकं वैतागले आहेत. त्यामुळे, आपण याचा फेरविचार करावा, लोकांमध्ये जागृती झालीय आता काहीतरी सकारात्मक कॉलर ट्यून ऐकवली तर त्यांना लढण्यासाठी तेवढी ऊर्जा तरी मिळेल, असे पवार यांनी म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:57 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here