कोकण रेल्वे धावणार विकासाच्या फास्ट ट्रकवर

0

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सुमारे ७०० कि.मी.अंतराच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी सुमारे रु.११०० कोटी इतका खर्च अपेक्षित असून हे काम दोन टप्प्यांमध्ये केले जात आहे. संपूर्ण कोंकण रेल्वेमार्गाची तोकुर ते वेरना (टप्पा १) व वेरना ते रोहा (टप्पा २) अशी विभागणी करण्यात आलेली आहे. टप्पा-१ मधील तोकुर ते उडुपी या सुमारे २०० कि.मी.च्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम ९० टक्क्यांपर्यंत झाले आहे.
रेल्वे मंत्रालयाने हाती घेतलेल्या मिशन इलेक्ट्रिफिकेशन या मोहिमेंतर्गत भारतीय रेल्वेच्या सुमारे २ लक्ष कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे सन २०२३ पर्यंत १०० टक्के विद्युतीकरण केले जाण्याचे प्रस्तावित आहे. रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांनी सांगितल्यानुसार सध्या देशातील एकूण वीजवापरापैकी १.३७ टक्के अर्थात २०.४४ कोटी युनीट्स इतका वीजवापर भारतीय रेल्वेद्वारे केला जातो; त्याचप्रमाणे देशात एकूण आयात केल्या जाणाऱ्या एच.एस.डी. या शीघ्रगती डिझेलपैकी ३ टक्के अर्थात ३.१ बिलियन लिटर्स इतके डीझेल हे भारतीय रेल्वेसाठी वापरण्यात येते. डिझेलच्या या अतिवापरामुळे देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्याने देशात प्रदुषणाची समस्या बळावली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने मिशन इलेक्ट्रिफिकेशन ही मोहीम हाती घेतली. मोहिमेचा खर्च सुमारे रु.७८,०००/- कोटी इतका असणार आहे. या मोहिमेमुळे इंधनाचा वापर तर कमी होईलच, शिवाय रेल्वेगाड्यांची संख्या वाढविता येईल, गाड्यांचा वेग वाढविता येईल आणि नव्या गाड्यासुद्धा सुरु करता येतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

डिझेल तुलनेत विजेच्या इंजीनाचे वेग वाढविणे व वेग कमी करणे या प्रक्रिया अधिक जलद गतीने होत असल्याने गाडीचा वेग वाढून प्रवासाचा वेळ कमी होतो. कोंकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले की दिल्ली व पूर्वेकडच्या राज्यांकडून थेट कन्याकुमारीपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्या विजेवर चालविणे रेल्वे प्रशासनास शक्य होईल, ज्यामुळे प्रदूषणाचा त्रास कमी होईलच शिवाय इंधनाचा बेसुमार वापर कमी होईल. मालाच्या व प्रवाशांच्या वाढीव वाहतुकीमुळे रेल्वेच्या महसुलात प्रचंड वाढ अपेक्षित आहे. सध्या कोंकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने पासिंग साठी गाड्यांना थांबवावे लागते. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे कोंकण रेल्वेचे पूर्ण दुहेरीकरण हे कठीण तर आहेच शिवाय खर्चीकही आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे दर दहा ते बारा कि.मी. च्या अंतरावर एक क्रॉसिंग स्टेशन तयार करीत आहे. कळंबणी, कडवई, पोमेंडी, खारेपाटण, अचिर्णे सापे -वामने ही नवीन स्टेशने पूर्ण झाली की क्रॉसिंगची ठिकाणे वाढून गाड्यांना जास्त वेळ थांबवावे लागणार नाही. सापे वामने स्टेशन महाड पासून जेमतेम 5 कि मि अंतरावर आहे .शिवाय ज्या गावांना आजवर रेल्वेचा लाभ मिळाला की ती गावे विकासाच्या मार्गावर येतील

अँड विलास पाटणे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:39 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here