कडवई बाजारपेठ उद्यापासून पाच दिवस बंद

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कडवईत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आजूबाजूच्या काही वाड्यांमधूनही पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत.या पार्श्वभूमीवर कडवई ग्रामपंचायत येथे प्रशासक विजय पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कडवई बाजारपेठ शनिवार दि.५ पासून ते बुधवार दि. ९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कडवई ग्रामपंचायत येथे प्रशासक विजय पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघटनेची एक सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थित व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औषधांची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दूध व भाजीपाला या सेवाही पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here