दापोलीत लाच घेणाऱ्याला पकडले रंगेहात

0

दापोली : लाकूड वाहतूक परवाना देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना दापोलीच्या वनविभाग कार्यालयातील खासगी इसमास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी दापोली येथील एका शेतकऱ्याकडून तोडलेली झाडे, जळाऊ लाकूड व इमारती लाकूड विकत घेतली. ही झाडे तोडण्याकरीता वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती मात्र तोडलेल्या झाडांच्या लाकडांची वाहतुकीसाठी पासाची मागणी तक्रारदार यांनी वन अधिकारी दापोली यांचे कार्यालय येथे केली होती. सदर पास देण्यासाठी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर व खासगी इसम सचिन आंबेडे यानी 20 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक वाहतुकीच्या पासाकरीता 1 हजार 300 रूपये प्रमाणे 5 पासांचे 6 हजार 500 रूपये रक्कमेची लाचेची मागणी केली. परंतु या लाकूड वाहतुकीच्या पासकरीता शासकिय फि रू. 100 इतकी असताना या दोन संशयितांनी तक्रारदार यांचेकडे 5 वाहतुकीच्या पासाकरीता 6 हजार 500 रूपये इतक्या रक्कमेची लाचेची मागणी करत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचेकडे दिली होती. या तकारीनुसार पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांचेकडे लाकूड वाहतुकीच्या पासाकरीता 6 हजार 500 रूपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती वाहतुकीच्या पासांचे 5 हजार रूपये त्यांचे कार्यालयात काम करणारे खासगी इसम सचिन आंबेडे यांनी स्विकारण्याचे मान्य केले. पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यानुसार गुरुवारी सापळा लावण्यात आला असता, वनपाल गणेश खेडेकर यांच्या सांगणेनुसार खासगी इसम सचिन आंबेडे यांनी तक्रारदार यांचेकडुन 5 हजार रुपये लाच घेताना दापोली येथील वनविभागाच्या वनपाल कार्यालयात गुरुवारी 4 वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण कदम, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक बिशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे यांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here