दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन

0

रत्नागिरी : जिल्हा स्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो, कोव्हिड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून माहे सप्टेंबर २०२० चा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ या वेळेत दरध्वनी व दूरचित्रवाणी (व्हिडीओ कॉन्फरन्स)च्या माध्यमातून होणार आहे. सदर लोकशाही दिनासाठी नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून सहभागी होता येईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील १०७७ व ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ७०५७२२२२३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे संपर्क साधून आपल्या समस्या मांडता येतील अथवा gbsratnagirirediffmail.com या ई-मेलवर अर्ज सादर करता येईल. लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या शासकीय कार्यालयाशी संबंधित विविध समस्यांबाबत निवेदने किंवा तक्रारी ऐकण्यात येतील. यामध्ये प्रथम माजी/ आजी सैनिक यांच्या शासकीय कार्यालयांशी संबंधित विविध समस्यांबाबत तक्रारी असल्यास त्यांची निवेदने किंवा तक्रारी प्रथम स्वीकारल्या जातील, असे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, रत्नागिरी यांनी कळवले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here