बेकायदा जुगार चालवल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे बेकायदा जुगार चालवल्याप्रकरणी ५ जणांविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाटे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५.३० वा.सुमारास ही कारवाई करत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा १६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेखर केदारी-पाटील (५५, रा. कालिकावाडी आडिवरे) व इतर ४ संशयितांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी सायंकाळी शेखर पाटील याच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये तो इतर ४ जणांसह बेकायदा जुगार खेळत होता. अधिक तपास पोलिस नाईक कांबळे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here