‘रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे’

0

चिपळूण : महाडमध्ये इमारत कोसळून दुर्घटना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातही अशाप्रकारच्या अनेक धोकादायक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभ्या राहिल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात असून जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. विजय भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, भोसले यांनी महाडच्या दुर्घटनेत १८ नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. वित्तहानीपेक्षा जीवितहानीचे मोल मोठे आहे. आतापर्यंत मुंबई, पुण्यात अशा घटना घडत होत्या. परंतु महाडसारख्या घटनांनी ग्रामीण भागातही इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे व पुढील उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here