शेतकऱ्यांना मिळणार गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रशिक्षण

0

सिंधुदुर्ग : भाजपचे राज्यसभा सदस्य सुरेश प्रभु यांच्या संकल्पनेतील परिवर्तन केंद्र व लुपिन सिंधुदुर्ग आणि मुळदे फिशरीज कॉलेज यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोडया पाण्यातील मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे. ज्यांच्याकडे शेततळी असतील असे शेतकरी या एक दिवशीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. या एक दिवसाच्या प्रशिक्षणाची फी ७५० रुपये असून त्यातील ५०० रुपये लुपिन सिंधुदुर्ग ही संस्था भरणार आहे. तर २५० रुपये रक्कम लाभार्थ्याने स्वतः भरायची आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक लाभार्थ्याला १००० रोहू आणि कटला माशाचे सिड मोफत दिले जाईल. प्रशिक्षणा दिवशी लाभार्थीने स्वतःचा जेवणाचा डबा, आधारकार्ड आणि डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन येणे आवश्यक आहे. तरी या संधीचा शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रताप चव्हाण, कृषी अधिकारी लुपिन सिंधुदुर्ग ९४०४९३५७५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिवर्तन केद्र सिंधुदुर्ग मार्फत शेतकरी बांधवाना आत्मनिर्भर करण्यासाठी हा प्रयत्न असुन केद्र सरकारच्या माध्यमातुन मच्छिमार बांधवांसाठी घोषीत केलेल्या आत्मनिर्भर योजनेसाठी लाभार्थीना फायदा होणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा संबंधितांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:48 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here