सांगली येथील प्रविराम फाउंडेशनतर्फे निसर्गबाधित शेतकऱ्यांना मदत

0

दापोली : साकुर्डे येथील निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सांगली येथील प्रविराम फाउंडेशनतर्फे एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. चक्रीवादळाचा साकुर्डे गावालाही फटका बसला. सांगली कामेरी येथील फाउंडेशनचे संचालक विकास कदम व प्रकाश कदम यांनी गावातील २० शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा धनादेश दिला. प्रभारी सरपंच सचिन बैकर, संदीप जोशी, संदीप बैकर, स्वप्नेश मोहिते, अविनाश जंगम आदींनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धनादेशाचे वाटप केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here