रत्नागिरी : गणशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून, नियमित गाड्यांव्यतिरिक्त मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने तब्बल 210 जादा गाड्या कोकणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा 647 हून जादा डब्यांची वाढ करण्यात आली आहे. जादा गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेने बंदोबस्तात वाढ केली असून, 204 आरपीएफ आणि होमगार्डच्या जवानांचा फौजफाटा कोकण रेल्वे मार्गावर तैनात ठेवण्यात येणार आहे. कोकणात गणपतीसाठी जाणार्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा कोकण रेल्वेने 210 जादा फेर्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ट्रेन क्र.12051/52 दादर-मडगाव जनशताब्दीला यंदा 30 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी रोडला थांबा देण्यात येणार आहे. तिकिटांच्या आरक्षणासाठी बुकिंग काऊंटरवर होणारी गर्दी कमी होण्यासाठी विविध स्थानकांवर गरजेनुसार अतिरिक्त बुकिंग खिडक्या उघडण्यात येणार आहेत. खेड, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर प्रथमोपचार केंद्रे सज्ज ठेवण्यात आले असून, चिपळूण, रत्नागिरी, थिविम, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडूपी येथे 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान आरोग्य केंद्रे खेड, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर प्रथमोपचार केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. चिपळूण, रत्नागिरी, थिविम, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडूपी येथे 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान आरोग्य केंद्रे उघडण्यात आली आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त स्टाफला सज्ज ठेवण्यात आले आहे. चेंगराचेंगरीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य पोलिसांशी समन्वय ठेवण्यात येत असून, आरपीएफ स्टाफला हेल्पलाईन 182वरून तसेच सोशल मीडिया ट्विटरवरून आलेल्या तक्रारींचाही छडा लावण्यासाठी सावध करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी होणारी गर्दी पाहता ट्रेन क्र. 11003/11004 दादर-सावंतवाडी रोड ‘तुतारी एक्स्प्रेस’चे डबे 15 वरून 19 आणि ट्रेन क्र.11085/11086 आणि ट्रेन क्र. 11099/11100 मडगाव एसी डबलडेकरचे डबे 11वरून 18 करण्यात आले आहेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करणारया चाकरमान्यांची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे.
