रत्नागिरी व्यापारी संघटनेच्या कोविड टेस्ट स्थळात बदल

0

रत्नागिरी : रत्नागिरी व्यापारी संघटनेतर्फे सुरू असलेल्या कोविड टेस्टच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.रत्नागिरीतील व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी शासनातर्फे करोनाविषयक अॅन्टीजेन टेस्ट रत्नागिरीत राधाकृष्ण मंदिरामध्ये घेतली जात होती. ती जागा बदलण्यात आली आहे. ही अॅन्टीजेन टेस्ट आता पालिकेच्या शाळा क्रमांक एकमध्ये (सावरकर पुतळ्याजवळ लक्ष्मी चौक, गाडीतळ) घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांबरोबर दुकानमालकांनीदेखील अॅन्टीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. ही टेस्ट करून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 05-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here