नातेसंबंध जपत कोरोनावर मात करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

0

मुंबई : आई-मुलाचे नातेसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावल्यासारखे झाले. त्यामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही काळीत टाकण्याची मानसिकता ठेवू नका. शिक्षित व्हावं योग्य ती खबरदारी घ्यावी परंतु नात्यातील, संबंधातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नवा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी केले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोनाः अवास्तव भीती व गैरसमज’ याविषयी केलेल्या चर्चेचा तिसरा भाग शुक्रवारी प्रसारीत झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, लोक भीतीपोटी खूप चुका करतात. एखादा कोरोनाबाधीत झाला तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. पनवेलमध्ये एका घटनेत आई असिंमटेमॅटिक होती. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी काळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. नातेसंबंध जपत आजारावर मात करा, असे ते म्हणाले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 05-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here