राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ, दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण

0

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शुक्रवारी राज्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात नव्या 19 हजार 218 कोरोनाग्रस्तांचं निदान झालं आहे. तर 378 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. दिवसभरात 13 हजार 289 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण होण्याचं प्रमाण आता 72.51 टक्के इतकं झालं आहे. आतापर्यंत एकूण 6 लाख 25 हजार 773 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 978 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत 25 हजार 964 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 3.01 टक्के इतका आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 05-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here