देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात असलेली ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. या धोकादायक इमारतीमध्येच डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. बांधकाम विभागाने या इमारतीकडे दुर्लक्ष केले असल्याने रुग्णांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात गंभीर जखमी होणाऱ्या रुग्णांना तत्काळ उपचार मि ळावेत, यासाठी संगमेश्वरवासीयांची ट्रामा केअर सेंटरचीमागणी होती.ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी येथील जनतेने सर्वपक्षीय आंदोलन पुकारले. त्याला यश मिळून ट्रामा केअर सेंटरचे काम हाती घेण्यात आले. सन ३० जुलै २००९ रोजी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ट्रामा केअर सेंटरचे काम हाती घेऊन लवकरच ते पूर्णत्वात गेले. मात्र, ट्रामा केअर सेंटर असूनही अनेकवेळा अपुऱ्या सुविधांमुळे ट्रामा केअर सेंटर गाजत आहे. पहिल्या दोन वर्षात अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे रुग्ण हैराण झाले होते. शेवटी वारंवार मागणी करुन कर्मचारी देण्यात आले आहेत. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाची इमारतीचा आजही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मात्र, या ठिकाणी नादुरुस्त असलेले पंखे तसेच इमारतीला असलेला दरडीचा धोका, झालेली दुरवस्था यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. शवगृहाच्या बाजुने ही इमारत पाहिली तर पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचे दिसत आहे. या बाजूच्या खिडक्या तसेच इमारतीचा तडे गेल्याचे दिसत आहे. इमारतीला धोका असूनही गर्भवती महिलांना या इमारतीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरकडे जाणारा रस्त्यावर नेहमीच चिखलाचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळते. चिखलातून मार्ग काढीत रुग्णांना व नातेवाईकांना रुग्णालयामध्ये प्रवेश करावा लागतो. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्तीचे काम हे बांधकाम विभागाचे आहे. मात्र, गेले कित्येक वर्षे या इमारतीच्या दरुस्तीकडे बांधकाम विभागाने पाहिलेही नाही. या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. म त्रि, अपुऱ्या सुविधांमुळे येथील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.
