लांजा बाजारपेठ बंद ला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

0

लांजा : लांजा तालुका व्यापारी संघाच्या वतीने लांजा शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने लांजा बाजारपेठेतील सर्व सेवा रविवारपासून सहा दिवस बंद ठेवण्यात आल्या. या बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुका आणि शहराचा विचार केल्यास मागील आठवड्यातील वाढलेल्या कोरोनाबाधितांचे आकडे पाहिल्यास कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत जाताना दिसत आहे. ही रुग्ण वाढ संक्रमणातून होत आहे. तरी या संक्रमणाची साखळी ब्रेक करण्यासाठी सध्या चालू असलेली बाजारपेठ सेवा सहा दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here