केळशी परिसरात इंटरनेट सेवा ठप्पच

0

दापोली : तालुक्यातील केळशी परिसरात गेले तीन महिने मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासावर होत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे पंचक्रोशीला इंटरनेटची सेवा देणाऱ्या कंपन्यांचे मोबाईलचे टॉवर या वादळात जमीनदोस्त झाले होते. मात्र मोबाईल सेवा तसेच इंटरनेट सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. अडीच महिन्यांनंतर बीएसएनएलने तात्पुरत्या स्वरूपात काही किलोमीटर पुरतीच सेवा सुरू केली. मात्र ऑनलाईन अभ्यासक्रम तसेच वर्क फ्रॉम होमच्या वाढत्या इंटरनेट वापरामुळे तीही अपुरी पडत आहे. तसेच काही नोकरवर्गाची कामे बंद झाली आहेत. या सेवा लवकरात लवकर सुरळीत कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here