राज्यात कोरोनाग्रस्तांची उच्चांकी वाढ; दिवसभरात तब्बल २३,३५० नवे रुग्ण

0

मुंबई : रविवारी दिवसभरात राज्यात उच्चांकी 23 हजार 350 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 328 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एका दिवसात राज्यात 7,826 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 44 हजार 440 इतकी झाली आहे. राज्यातला रिकव्हरी रेट 71.03 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 7 हजार 212 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 35 हजार 857 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.राज्यात आजपर्यंत एकूण 26 हजार 604 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्याचा राज्यातील मृत्यूदर 2.93 टक्के इतका आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here