चिपळूणात घरफोडी करून चोरट्याने ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला

0

◼️ रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने गेले चोरीला

चिपळूण : खरवते तांबडवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील बंद घरात लोखंडी ग्रील उचकटून प्रवेश करीत चोरट्याने लॉकर मधील २२ हजार रुपये रोख, १५ हजाराची सोन्याची अंगठी, ८ हजार किमतीच्या चांदीच्या ४ मुर्त्या व अडीच हजाराचे चांदीची नाणी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत विनोद विश्वनाथ वझे वय ४९, रा. पाचाडतळी, बुरुडवाडी टा. चिपळूण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. विनोद वझे यांच्या बहिणीचे सासरे अनंत सखाराम सावंत यांच्या मालकीचे हे घर आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 07/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here