लंडन : ब्रिटिश मुस्लिम खासदार लॉर्ड नजीर अहमद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधीत एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. यामुळे सोशल मीडियावरचे वातावरण चांगलेच तापले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, या सर्वांचा एका वर्षाच्या आत मृत्यू झाला. यांच्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा नंबर असल्याचे ब्रिटिश मुस्लिम खासदार लॉर्ड नजीर अहमद यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या लॉर्ड नजीर अहमद यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘भाजपच्या एका नेत्याने दावा केला आहे की, जादूटोणा, तंत्र-मंत्र यामुळे भाजपमधील नेत्यांचे मृत्यू होत आहेत. या दाव्यात म्हटले आहे की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गेल्या एका वर्षाच्या आत निधन झाले. आता पुढचा नंबर नरेंद्र मोदी यांचा’.
