संगमेश्वर खाडीभागाला वादळी मुसळधार पावसाचा तडाखा

0

संगमेश्वर : तालुक्यातील खाडीभागातील कोंड्ये विभागाला काल जोरदार वादळाचा तडाखा बसला. या वादळात खाडी भागाला मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकसानाची पाहणी करुन तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शिवसेना खाडी विभाग प्रमुख महेश देसाई यांनी केली आहे. येथील सुरेश बोमे यांच्या घरावर पोफळीचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तर दीपक शिंदे यांच्या घराचे सुद्धा मोठे नुकसान झाले, अशोक बोमे, आत्माराम बोमे, अनंत बोमे, बाळकृष्ण चिखलकर यांच्या घरावर कलम कोसळले. संतोष देसाई यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळले. याचबरोबर मांजरे येथील विजय देसाई यांच्या घरावर झाड कोसळून, विष्णू देसाई यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. चंद्रकांत साळवी यांची 10 कलमे जमीनदोस्त झाली तर त्यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे. कालच्या पावासामुळे कोंड्ये फुणगुस खाडी भागात मोठे नुकसान झाले असून पावसापेक्षा वादळाचा मोठा तडाखा बसल्याने येथील महावितरणच्या लाईन, पोल तुटले आहेत. गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय यंत्रणेने त्वरित याचे पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here