पूर्णगड किल्ल्याच्या दुरुस्त केलेल्या तटबंदीला अल्पावधीतच तडे

0

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड येथील किल्ल्याच्या दुरुस्त केलेल्या तटबंदीला दुरुस्तीनंतर अल्पावधीतच तडे गेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. पूर्णगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने चार कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कामाला सुरवात करण्यात आली. बहुतांश काम पूर्ण झाले. मात्र दुरुस्तीच्या या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण करण्यात येत आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या दुरुस्तीत तटबंदीच्या खालील भागात पर्यटकांना फिरणे सोयीचे व्हावे म्हणून बांधण्यात आलेल्या चिरेबंदी भिंतीच्या भागाला तडे गेले आहेत. राज्य शासनाकडून किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने अनेक किल्ल्यांच्या दुरुस्तीकरिता आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देऊन नव्या पिढीला इतिहासाची साक्ष पटवून देण्यासाठी निधी उपलब्धता करून देण्यात आला. रत्नागिरी तालुक्यादतील पूर्णगड येथील टेहळणी गढी म्हणजेच किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी चार कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. दोन वर्षांत या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. काम पूर्ण केल्यानंतर गडाच्या तटबंदीच्या बाहेरील भागात पर्यटकांना व्यवस्थित फिरता यावे व तटबंदी संरक्षित राहावी, यासाठी भिंत बांधण्यात आली. मात्र याच भिंतीच्या आतील भागात अनेक ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे लवकरच ही संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या आतील भागात बांधलेल्या इतिहासकालीन कोठाराचे बांधकाम केले असले, तरी त्यावर शाकारलेली मंगलोरी कौले तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे कोठारांमध्ये पाणीगळती होत आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. किल्ल्याच्या परिसराची जागा खासगी मालकाच्या नावाने असूनही पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीचे काम केले. त्यासाठी मूळ मालकाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न संतोष तोडणकर, अजय भिडे, हेमंत अभ्यंकर आणि गावखडी-पूर्णगड तसेच कुर्धे परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here