आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक

0

नवी दिल्ली : बहुचर्चित आयसीआयसीआय बॅक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी चंदा कोचर यांना ईडीने सोमवारी चांगलाच दणका दिला. या प्रकरणात ईडीने चंदा यांचे पती दिपक कोचर यांना सोमवारी रात्री अटक केली. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात दिपक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्या चौकशीत दिपक यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here