पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून देण्याची मागणी

0

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून द्यावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. नातू यांनी निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता द्यावयाच्या पोषण आहार यावर्षी प्रथमच राज्य सरकारने सुरू केला आहे. शाळा सुरू नसतानाही गणपतीपूर्वी हा पोषण आहार काही शाळांपर्यंत पोहोचविण्यात आला. काही शाळांना गणपतीच्या सुट्टीच्या काळात याचे वितरण करण्यात आले. त्याचे वितरण मुलांना झाले की नाही, याची तपासणी झालेली नाही. चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गोदामात अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार होता. त्या धान्यसाठ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याच गोदामातून आजही धान्य पुरवठा होत आहे. त्यामुळे मुलांकरिता मिळणारे पोषण आहाराचे धान्य किती योग्य, अयोग्य आहे. याची तपासणी होणे गरजेचे आहे. विद्यार्थी पोषण आहाराच्या धान्याचे वाटप शाळांनी कशा प्रकारे करावे, याबाबतही शासनाने नियमावली ठरवून द्यावी. डॉ. नातू यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेला या निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here