अखेर तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर महामार्ग जमीन मोबदला मिळणार

0

रत्नागिरी : मिर्‍या-नागपुर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जमीन जाणार्‍या खातेदारांची तीन वर्षांनी मोबदला मिळण्याबाबतची प्रतिक्षा संपली आहे. रत्नागिरी ते आंबा या सुमारे 69 किमी भागासाठी 27 गावांमधील क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यातील साठरे आणि पाली गावातील मोबदला वाटप सुरू होणार आहे. खातेदारांची खाती व इतर माहिती घेण्यासाठी महसुल विभागाने कॅम्पचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे सुमारे महिनाभर हे काम चालणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया 2017 मध्ये सुरू झाली. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या 69 किमी चौपदरीकरणासाठी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडून भूसंपादन करण्यात आले. यामध्ये संगमेश्‍वर तालुक्यातील 13 गावांमधील सुमारे 13 लाख 36 हजार 837 चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील 14 गावांमधील 6 लाख 52 हजार चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. रत्नागिरील 6 आणि संगमेश्‍वर तालुक्यातील 10 अशा, एकुण 16 गावातील जमिन मालकांचा मोबदला निवाडेही फेब्रुवारी 2019 मध्ये झाले. या निवाड्यांची एकुण रक्कम 314 कोटी 13 लाख 21 हजार इतकी झाली आहे. दोन्ही तालुक्यातील या निवड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकेड पाठविण्यात आले होते. वर्षांनंतर फेब्रुवारी 2020 मध्ये केवळ रत्नागिरी तालुकतील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम 69 कोटी 13 लाख 11 हजार 164 रुपये प्राधिकरणाकडुन येथे उपविभाकीय कार्यालयाला प्राप्त झाली. मात्र कोरोना संकटामुळे निधी वाटप खोळंबळे होते. मात्र महसुल विभागाने कॅम्प आयोजित करून खातेदारांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. साठरे येथील 16, पाली बाजारपेठेतील 49 तर पालीतील 74 खातेदारांची बँक खाती व इतर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:31 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here