भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा चीनचा आरोप

0

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र सुरूच आहे. अशातच सोमवारी रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केला असल्याचा आरोप चीननं केला आहे. लडाखच्या पँगाँग सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, चीनी सैनिक भारतीय जमिनीवर कब्जा करण्याच्या हेतूने गलवानसारखी हिंसक घटना घडवू इच्छित होते आणि म्हणूनच भारतीय सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला, असे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या पूर्वी लडाखमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, भारतीय सेनेने या घुसघोरांना सडेतोड उत्तर दिलं. पँगाँगच्या नदी पात्राच्या दक्षिणी भागात शेनपाओ डोंगराळ भागात ही घटना घडली. पँगाँग नदी पात्राच्या दक्षिणी किनाऱ्यावर चीनने घुसघोरीचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा मनसुबा भारतीय सैनिकांनी हानून पाडला. भारतीय सैनिकांनी वॉर्निंग फायरिंग करून चीनच्या सैनिकांना तिथेच रोखलं. चीनने आता उल्टा आरोप भारतावर लावला आहे की, त्यांनी चीनला उकसवलं आहे. चीनने भारतीय सेनेवर LAC पार करण्याचा आरोप केला आहे. चीनचा असा आरोप आहे की, भारतीय सेनेने LAC वर चीन सैनिकांनी उकसावण्याचा प्रयत्न केला आणि चीन सैनिकांवर गोळीबार देखील केला. लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) वर पूर्वी लडाख परिसरात चीनी सेनाने फायरिंग केलं. सोमवारी रात्री हा गोळीबार भारतीय चौकीच्या दिशेने करण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने फायरींग करून चीनला समज दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:17 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here