ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं पंकजा मुंडेंनी केलं कौतुक

0

मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने “वन महाराष्ट्र, वन मेरिट” अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत घोषणा केली. ठाकरे सरकारच्या या महत्वाच्या निर्णयाचे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केल आहे. ‘वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०: ३० चा फार्म्युला अखेर रद्द झाल्याने मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी योग्यच..’ अस ट्विट करत पंकजा मुंडे ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here