वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या तपासणीकरिता वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश जारी

0

रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांनी, राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील पूल क्र.1 (किमी.211/770) व पूल क्र. 2 (किमी 211/960) तसेच संगमेश्वर येथील शास्त्री पुल (किमी 258/850) सुरक्षिततेच्या दृष्टीने Structural Audit (स्ट्रक्चरल ऑडिट) नियुक्त एजन्सी मार्फत करावयाचे असल्याने महार्गावरील वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता Structural Audit (स्ट्रक्चरल ऑडिट) करणेकरीता अनुक्रमे दिनांक 10, 11, 12 सप्टेंबर, 2020 या दिवशी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत वाशिष्ठी व शास्त्री पुलावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशित केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

सदर पूलांपैकी वाशिष्ठी पूलाकरिता पर्यायी रस्ता म्हणून चिपळूण बायपास फरशी तिठा (रा.मा.136) हा मार्ग व शास्त्री पुलाकरीता पर्यायी रस्ता शास्त्री पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ (प्र.जि.मा.46 व 47) (22.00 कि.मी.) वापरता येऊ शकणार आहे.

लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी, यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेता मोटार वाहन अधिनियम – 1988 चे कलम 115 नुसार खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत

राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील पुल क्र. 1 (कि.मी.211/770) सर्वप्रकारची वाहतूक दिनांक 10 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत आणि पुल क्र. 2 (कि.मी.211/960) सर्वप्रकारची वाहतूक दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत बंद करण्यात येत आहे. तसेच सदरील दोन्ही पुलावरील वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण बायपास फरशी तिठा (रा.मा. 139) हा वापरण्यात यावा.

संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील शास्त्री पूल (कि.मी.258/850) सर्वप्रकारची वाहतुक दिनांक 12 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत बंद करण्यात येत आहे. तसेच सदरील पुलावरील वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून, शास्त्री पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ (प्र.जि.मा. 46 व 47) हा वापरण्यात यावा.

या दृष्टीने मोटार वाहन अधिनियम – 1988 चे कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभाग (वाहतुक) व राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांनी करावयाची आहे असेही आदेशात नमूद केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:49 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here