पात्र दिव्यांगाना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या तहसीलदारांना सूचना

0

रत्नागिरी : दि. 31-08-2020 रोजी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी दिलेल्या निवेदनाची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कुटूंब प्रमुख दिव्यांग असणाऱ्या तसेच एकल दिव्यांगांना निश्चित उदरनिर्वाहाचे साधन नसेल तर अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देणे बाबत स्पष्ट सूचना तहसीलदारांना देणारे पत्र आज जिल्हा पुरवठा अधिकारी मा. श्री. महेश पाटील साहेब यांनी आस्थाच्या सुरेखा पाथरे यांना सुपूर्द केले. या पत्रानुसार मंजूर इष्टकांचा विचार करता अंत्योदय अन्न योजनेचा मंजूर परंतु अखर्चीक इष्टांकातून 3770 दिव्यांग कुटुंब प्रमुख असणाऱ्या दिव्यांगांना यामुळे लाभ मिळणार आहे. तरी पात्र दिव्यांग कुटूंबप्रमुखांनी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क करून त्वरित विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत . असे आवाहन आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे समन्वयक श्री. संकेत चाळके यांनी केले आहे.विशेष म्हणजे यामध्ये कुटूंबप्रमुखाकडे निश्चित म्हणजेच कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन नसलेले दिव्यांग पात्र ठरणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिव्यांगांचा अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:06 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here