मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार

0

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कृषिविषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ ते १.३० या वेळेत शेतकऱ्यांशी ऑानलाइन संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार या संवादाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या यू-ट्यूब चॅनेलवर थेट प्रसारण करण्यात येईल. “विकेल ते पिकेल” योजनेअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात यावेळी करण्यात येईल. याप्रसंगी मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषी विकास कार्यक्रमाची रूपरेषा मांडणार असून चिंतामुक्त शेतकरी व शेतकरीकेंद्रित कृषी विकास यावर आपले विचार मांडतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:03 AM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here