चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी; ईडीचा दावा

0

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची १३ देशांमध्ये संपत्ती असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)ने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात केला आहे. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती करताना ईडीने सदर युक्तीवाद केला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आयएनएक्स मिडिया घोटाळ्याप्रकऱणी सध्या सीबीआय कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती ईडीतर्फे सर्वोच्च न्यायलयात करण्यात आली. सदर प्रकरणात चिदंबरम यांनी परदेशात संपत्ती विकणे आणि परदेशी बँक खाती बंद केल्याच्या पुराव्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये चिंदबरम यांची संपत्ती आणि बँक खाती असल्याचे ईडीने न्यायालयास सांगितले, अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनॅको, फिलीपाईन्स, सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका आदी देशांमध्ये त्यांची मालमत्ता असून तेथे बँक खातीही उघडण्यात आली आहेत. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या बँक खात्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाले, असे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here