चिपळुणात उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

0

चिपळूण : येथील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या चिपळूण विभागीय कार्यालयाच्यावतीने ४३व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल अतिथी येथे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिराचे नियोजन रत्नागिरी झोन अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव महेंद्र पारकर, संघटक संतोष रसाळ, शशिकांत चव्हाण हे करीत आहेत. या शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here