नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सिंधूने वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यानंतर तिच्यावर देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचे कौतुक केले आहे. सिंधू भारताचा अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी सिंधूबरोबरच्या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. मोदींनी सिंधूबरोबरचे फोटो शेअर करत ‘भारताचा अभिमान, चॅम्पियन जिने सुवर्णपदक आणि गौरवही देशात आणला. तिला भेटून आनंद झाला. सिंधूचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा असे ट्विट केले. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी सिंधू क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना भेटली. त्यावेळी त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तिला १० लाख रुपयांचा चेक पारितोषिक म्हणून दिला.
