…त्यामुळे अमेरीकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कमला हॅरिस बनूच शकणार नाहीत : ट्रम्प

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युएस डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली. एका सभेस संबोधीत करताना राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, युएस डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांना लोक पसंद करीत नाहीत त्या अमेरीकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनूच शकणार नाही. असे झाल्यास हा आपल्या देशाचा अपमान असेल. जागतिक कोरोना संकटा संदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आपण चीनशी महत्वाचा करार केला होता मात्र कराराची शाई वाळाळचीच होती तर कोरोनाची साथ आली. त्यामुळे त्या कराराकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो आहे. अमेरिकेत यावर्षी राष्ट्रपती निवडणूक आहे मात्र कोरोना संकटाचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:03 PM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here