अ‍ॅन्टीजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’ तैनात

0

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडून कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. लवकर निदान, लवकर उपचार अशी या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी आपल्यासाठी उपक्रम राबविली आहे. यामध्ये मोफत अ‍ॅन्टीजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’ रत्नागिरी शहर आणि परिसरात तैनात केल्या आहेत. गर्दी आणि हॉटझोनमध्ये अ‍ॅण्टीजेन तपासण्या करण्यात येणार आहेत. ही पथके कोरोना सदृश्य लक्षणे असणार्‍यांची तपासणी करणार आहेत. शहर आणि परिसरातील कोरोना हॉटझोनमधील गर्दीची ठिकाणे निवडून तेथील स्वयंस्फुर्तीने आलेल्या लोकांची तपासणी करणार आहेत. वेळीच निदान करुन शंकानिरसन करण्यासाठी अ‍ॅन्टीजेन टेस्टींग सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:40 PM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here