लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याबाबत आंदोलनाचा इशारा

0

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी. याबाबत योग्य तोडगा निघाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी दिला आहे. या वसाहतीतील रासायनिक सांडपाणी थेट दाभोळ खाडीत सोडले जात असल्याने जलप्रदूषण होऊन मासेमारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या भोई समाज बांधवांची उपासमार होऊ लागली आहे. जलप्रदूषणामुळे मासेमारी धोक्यात आली आहे. वायुप्रदुषणामुळे आंबा, काजू या नगदी पिकांसह भातशेतीची पुरती वाट लागली आहे. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी आतापर्यन्त विविध प्रकारची आंदोलने छेडण्यात आली. मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. आता अंतिम लढाई करण्याच्या निर्णयापर्यंत मच्छीमार आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली जनता आली आहे. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी वेळीच दखल घेतली नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे खेड तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here