भाजप पक्षाने गेल्या काही महिन्यांमध्ये तीन ज्येष्ठ नेते गमावले आहेत. त्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि बाबुलाल गौर या नेत्यांचे असे अचानक जाणे हे भाजपसाठी अनपेक्षित होते. त्यामुळे पक्ष नाही म्हंटल तरी थोडा खचला आहे. या दु:खद प्रसंगावर एका ब्रिटीश खासदाराने वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये चक्क पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे.
लॉर्ड नझीर अहमद हे ब्रिटीश संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्डचे आजीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले मुस्लिमधर्मीय नेते आहेत.
‘भाजपा नेत्यांचं एकापाठोपाठ एक निधन होत आहे आणि आता पुढचा नंबर नरेंद्र मोदींचा आहे’, अशा आशयाच ट्विट लॉर्ड नझीर अहमदने केले आहे. साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्याचा धागा पकडत लॉर्ड नझीर अहमदने हे वादग्रस्त ट्विट केले आहे.
https://twitter.com/nazir_lord/status/1165925619194048513?s=19
दरम्यान विरोधकांच्या वाईट शक्तीच्या प्रयोगामुळेचं भाजपचे तीन ज्येष्ठ नेते दगावले असल्याचा आरोप भाजप भोपाळच्या खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता. या वाईट शक्तीच्या प्रयोगाबाबत मला एका महाराजांनी सांगितल होत असं देखील म्हणाल्या आहेत. माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि एमपीचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या शोकसभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.
