रनप च्या पत्रकार कक्षाचे व शिळ धरणावरील जनरेटरचे आज ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

0

रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांसाठी नगरपालिकेचा पत्रकार कक्ष उभारला असून या सुसज्ज पत्रकार कक्षाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. तसेच नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या विशेष प्रयत्नामुळे शिळ धरणावर सुमारे सव्वा कोटी किमतीचे दोन नवीन जनरेटर बसवण्यात आले असून त्याचा देखील शुभारंभ आज ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या जनरेटरमुळे आता वीजप्रवाह खंडित झाला तरी रत्नागिरी शहराच्या पाणी व्यवस्थेत बाधा येणार नाही. आज होणाऱ्या पत्रकार कक्षाच्या कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजु व तालुकाध्यक्ष राजेश शेळके यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:22 AM 10/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here